शूद्र पूर्वी कोण होते या पुस्तकात प्रस्तावना बाबासाहेब लिहितात की हे पुस्तक लिहिला आहे या पुस्तकानंतर हिंदू समाज शांत बसणार नाही कारण ज्या वेदाला सर्वस्व मानून त्याच्यानुसार आचरण करणाऱ्या हिंदूंना माझे विचार कदापि पटणार नाहीत. या पुस्तकात चार वर्णव्यवस्थेवर जे काही लिहिले आहे ते पुराव्यानिशी लिहिलं आहे तरीपण या पुस्तकाबद्दल जुन्या मताचा हिंदु कोणताही अभिप्राय देईल याची मला पूर्ण कल्पना आहे कारण गेली कित्येक वर्षे मी या गृहस्थाबरोबर कुस्ती खेळत आहे मला जी एक गोष्ट पूर्वी माहीत नव्हती ती नम्रपणे वागणारा आणि निरूपद्रवी दिसणारा हिंदू यांच्या पवित्र धार्मिक ग्रंथावर जर कोणी हल्ला केला तर तो मारामारी करण्यास कसा प्रवृत होतो. मी याच विषयावर गेल्यावर्षी मद्रास मध्ये व्याख्यान दिले होते तेव्हा माझ्या व्याख्या मुळे सोडून गेलेला पुष्कळ हिंदूंचा समतोल नष्ट झाला व रागारागानं लिहिलेल्या पत्रांचा त्याने माझ्यावर भडिमार केला हे पत्र वाचल्यानंतर मला त्या गोष्टींची पूर्वी झाली नव्हती इतकी जाणीव झाली सांगता येणार नाही आणि छापता येणार नाहीत. अशा घाणेरड्या शिव्यांचा लाखोली त्या पत्रामध्ये मला वाटली होती माझा खून आता करू मग करू अशा प्रकारच्या धमक्या येईल त्या पत्रामध्ये होत्या याबाबतीत तुमच्या हातून जो गुन्हा झाला आहे तो तुमचा पहिला गुन्हा आहे, म्हणून आम्ही तुम्हाला काही न करता मोकळे सोडून देतो असे त्यांनी गेल्या काही वेळी मला बजावले होते. आता ते काय करतील याची मला कल्पना नाही कारण हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना एक कळून येईल की ते ज्यांना पवित्र ग्रंथ समजतात त्या ग्रंथामध्ये राजकीय हेतू साध्य करण्यासाठी व दुसऱ्या वर्गाची कुचंबना करण्यासाठी ब्राह्मणांनी खोटेनाटे मजकूर तयार करून धुसडून दिले आहेत, ही गोष्ट इकडचे तिकडचे प्रबळ पुरावे देऊन सिद्ध करून दाखवले आहे. हे माझे कृत्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने पहिल्या गुन्ह्याची वाढवलेल्या स्वरूपाची आवृत्ती होय. पुस्तकातील हा प्रकार पाहून त्यांच्या माझ्यावरचा रागाचा पारा चांगलाच वाढला असेल हे नक्की अशा लोकांच्या शिवीगाळीची किंवा धमक्या ची मी काळजी करीत नाही कारण लोक म्हणजे आपल्या धर्माची बाजू राखण्याचा आवडणारे पण धर्म व्यापार करून गबर झालेले नीच कोटीतील मानवप्राणी आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. ते जगातील कोणत्याही इतर प्राणीमात्रापेक्षा जास्त स्वार्थी आहेत आणि आपल्या जातीतील आपल्या सारख्याच इतर स्वार्थी लोकांची पत राखण्यासाठी ते आपल्या जातीतील आपल्या बुद्धिमत्तेच्या वेश्याव्यवसाय करीत आहेत. हिंदू पवित्र ग्रंथ विरुद्ध बोलण्याचे धैर्य ज्या माणसांमध्ये आहे अशा माणसाने प्रामाणिकपणे या ग्रंथाबद्दल जर आपले सत्यशोधक विचार प्रदूषित केले तर त्या जर मताची पिसाळलेली कुत्री सोडण्यात येतात अशावेळी स्वतःला उच्च प्रतीचे सुशिक्षित समजणारे आणि मानमान्यतेच्या उच्च प्रतीच्या जागा सुशोभित करणारे त्याचे प्रमुख हिंदू लोक त्यांना या विषयासंबंधी काही स्वारस्य वाटत नसतानाही आणि ते निधड्या अंतकरणाचे दिलदार लोक आहेत असा त्यांच्याबद्दल समजता नाही या वादात शिरतात आणि जीर्णमतवाद्यांच्या सुरात आपला सुर मिळवितात ही काही लहान आश्चर्याची गोष्ट नाही. हायकोर्टाचे हिंदू न्यायाधीश आणि संस्थानाचे हिंदु मुख्य प्रधान हे लोक सुद्धा वरील लोकांच्या तांड्यात शिरण्यास मागेपुढे पाहत नाहीत हे लोक यांच्यापुढे ही जातात.
– डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
लेखन – आयु.शशी गायकवाड, संपादक (पुणे)