Friday, May 27, 2022

राष्ट्रीय तपास संस्था भीमा कोरेगाव दंगलीचा खरा तपास पूर्ण करेल का …?

1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली त्या दगडी नंतर ती दंगल संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यामुळे झाली असं म्हणत आंबेडकरी चळवळीतील दोघांनी गुन्हे दाखल केले त्यानंतर 8 जानेवारी तुषार दामगुडे यांनी एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगाव दंगल घडल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला तसेच पुणे पोलिसांनी एलगार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व सहकार्यावर गुन्हे दाखल केले तसेच भारताच्या कानाकोपऱ्यातून सर्व कवी लेखक पत्रकार आणि वकील यांना अटक केली तसेच सदर प्रकरणात अटक केलेल्या सर्व सभासदावर 17 मे 2018 रोजी भारतीय दंडविधान नुसार कलमं 13, 16, 18, 18बी, 20, 39 आणि 40 लावली. आणि बाकीचा तपास चालू ठेवला.
त्यानंतर 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून भाजपच्या सत्ता गेल्यामुळे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आल्यावर शरद पवार यांनी भीमा कोरेगाव दंगलीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रात एल्गार परिषदेवर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य नसल्याचं पत्रात लिहिलं होतं त्या पत्रानंतर भीमा कोरेगाव संदर्भाच्या हालचालींना वेग आला लगेच केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करत या प्रकरणाची प्रकरणाचा तपास एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्था यांच्याकडे सुपूर्द केला या प्रकारानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत हा झालेला प्रकार असंविधानिक असल्याचं सांगितलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं सांगत केंद्र सरकारची पाठ राखण केली.
या सगळ्या प्रकारात कवी लेखक पत्रकार आणि वकील या लोकांनी पंतप्रधानांचा हत्येचा कट रचल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास संस्थेने दिनांक 24 जानेवारी 2020 रोजी दुसरी एफ आय आर दाखल करत त्यामध्ये भारतीय दंडविधानातील कलमं 153ए, 505(1)(बी), 117 आणि 34 लावण्यात आली. त्याचसोबत यूएपीएमधील कलमं 13, 16, 18, 18बी, 20, 39 लावण्यात आली.
मुंबई हायकोर्टाने सदर प्रकरणातील चार्टशीट लवकरात लवकर कोर्टात दाखल करण्याचे आदेश दिले तरीपण राष्ट्रीय तपास संस्था यांच्याकडून चार्ट शीट कोर्टात दाखल केलेली नाही तसेच मुंबई हायकोर्टाने कोणी पोलिसांना फटकारत विचारलं शिवप्रतिष्ठान चे संभाजी भिडे यांना अटक का केली नाही त्यावर पुणे पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करू असं स्टेटमेंट कोर्टात दिलं.
या सगळ्या प्रकारामध्ये अटक असलेल्या सोळा लोकांना आज पर्यंत जामीन भेटलेला नाही जवळपास या घटनेस चार वर्षे पूर्ण होऊन गेली तरीपण जामीन दिला गेला नाही. स्टॅन्ड स्वामी आणि वरवरा राव हे दोन अटक असलेले सदस्य तुरुंगातच मरण पावले. भारताच्या कानाकोपऱ्यातून अटक केलेल्या सदस्यांचे नावे खालील प्रमाणे…..
गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, सुधीर ढवळे,महेश राऊत रोना विल्यन व्हनरेन गोन्सालविस हनी बाबू आनंद तेलतुंबडे ज्योती जगताप सागर गोरखे रमेश गायचोर मिलिंद तेलतुंबडे शोमा सेन स्टॅन स्वामी अरूण फरेरा इत्यादी. सदर अटकेत असलेले सदस्य यांचा संबंध माओवादी संघटनेचे असल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे सदर सदस्यापासून लॅपटॉप पेन ड्राईव्ह पुस्तके हस्तगत केल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. सदर लॅपटॉप मध्ये काही मेल्स आढळून आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसेच लॅपटॉप मधील मेल आणि डॉक्युमेंट्स घुसवले गेल्याचा आरोप अमेरिकेतील कंपनीने केला आहे. सदर प्रकरणाची सत्यता तपासून लवकरात लवकर या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण…? राष्ट्रीय तपास यंत्रणेने चार वर्षात काय तपास केला खरंच हे 16 सदस्य या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत का आणि भीमा कोरेगाव दंगल संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यामुळे घडली तसेच संभाजी भिडे ला पुणे पोलिसांनी अटक का केली नाही याचे कारण राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुणे पोलिसांना कारणे नोटीस देत अहवाल मागितला पाहिजे. सदर प्रकरणात अटकेत असलेले सदस्य हे सगळे कवी लेखक पत्रकार आणि वकील आहेत हे लोक पंतप्रधानांचा हत्येचा कट आणि भीमा कोरेगाव दंगल कसे घडू शकतात त्याचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करावी. अटकेत असलेल्या 16 सदस्य ते साठ वर्षाच्या पुढील आहेत त्यांना सडत ठेवत त्यांना मरेपर्यंत तेथेच ठेवणार आहात का जर पुढे या प्रकरणातील आरोपी नसल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचे जेलमध्ये गेलेले चार वर्षांची भरपाई राष्ट्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकार पुणे पोलीस हे भरून काढणार का….?

– आयु.शशिकांत श्रीमंत गायकवाड, संपादक 🖋️

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,333FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles