Friday, May 27, 2022

बाबासाहेब समजून घेताना…

 बाबासाहेब..... 
   एक सत्य की भारतात अनेक बाबा झाले,अनेक साहेब झाले परंतु ह्या धर्तीवर एकच,अमर्याद विद्वत्तेचा,अजरामर महामानव म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.दुःख ह्याच गोष्टीचे की बाबासाहेब म्हटलं की एका विशिष्ट जातीचा नक्कीच विचार केला जातो.बाबासाहेबांनी देशाला बहाल केलेली सर्वोच्च राज्यघटना ज्या मुळे अनेकांना जगायला मिळाले,बोलायला मिळाले मुळात माणूस म्हणून जन्म मिळाला असे असले गुडघ्यात अक्कल असणारे देखील बाबासाहेबांचे वर्गीकरण करतात.न्याय,समता,स्वातंत्र्य,समानता,बंधुता,न्याय,सुव्यवस्था ह्याची देणगी देणारा महापुरुष आपण का वाटून घ्यावा?आणि ते योग्य असू शकते का? 
   'शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा महामंत्र देणारा युगप्रवर्तक युगपुरुष म्हणजे बाबासाहेब.महाडच्या चवदार तळ्याचे द्वार खुले करताना दिलेला महासंदेश म्हणजे 'हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुक्तीसाठी आहे,' 'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही' ह्यासारखे असंख्य विचार वाचताना,अनुभवताना अंतरंगात एक नवी चकाकी येते,ऊर्जा मिळते,आशा पल्लवित होतात आणि मग माणूस असल्याची नक्कीच जाणीव होऊ लागते.
   आरक्षणावरून तर विचारशून्य माणसं कसलाच विचार न करता बोलू लागतात की बाबासाहेब ह्यांनी फक्त बौद्धांनाच आरक्षण दिले.वा रे।।। आरक्षणाचा अगदी जवळून अभ्यास केला तर त्यात फक्त बौद्धांचाच विचार नसून समस्त मानवजातीचा केलला समान विचार कोणीच विचारात घेत नाही.असो, कोणाच्या समजण्यावरून बाबासाहेब ह्यांचे स्थान कमी होणार नाहीच कारण त्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि ती अशीच अजरामर राहील ह्यात शंका नाही.मुळात बाबासाहेब समजून घ्या.त्यांनी ना कोणत्या एका जातीसाठी काम केले ना एका पंथासाठी ना विशिष्ट वर्गासाठी.सामाजिक कल्याण्यासाठी झटत असताना त्यांना झालेला त्रास,वेदना समजून घेतल्या तर कदाचित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून घेता येतील आणि समजून घेणे काळाची गरज आहे.भविष्यासाठी,हितासाठी,जगण्यासाठी आणि अजरामर होण्यासाठी.
    जय भीम.

शब्दांकन
आयु.तुषार गौतम नेवरेकर
दाभीळ,दापोली (रत्नागिरी)
7218467963

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,333FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles